लेखा परिक्षण, वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी वाढविण्याबाबत सहकारसुत्र च्या विनंतीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद
लेखा परिक्षण, वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी वाढविण्याबाबत सहकारसुत्र च्या विनंतीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद - दयानंद नेने यांनी मानले सरकारचे आभार मंत्रिमंडळ बैठक : दि. 23 जुलै 2020 *सहकार विभाग* *सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता* *लेखा परिक्षण, वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी वाढविण्याबाबत* महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील विविध कलमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीस आणि लेखा परिक्षणास मुदतवाढ देण्याची सुधारणा करण्यात येईल. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 27 मधील तरतुदीनुसार संस्थेच्या क्रियाशील सभासदांनाच संस्थेच्या निवडणूकीमध्ये मतदान करता येते. संस्थेचा क्रियाशील सभासद होण्यासाठी, काही किमान सेवा घेणे व 5 वर्षातून किमान एकदा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे कलम 75 मधील तरतूदीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ...