7/12 व society
7/12 व society
सहकारी गृहरचना संस्था यांचे 7/12 अभिलेखात कबजेदार सदरी सदर society चे नाव त्या नंतर आडवी रेघ ओढून त्या खाली सदर society मधील सर्व share सर्टिफिकेट वर नमूद फ्लॅटधारक यांची पूर्ण नावे नमूद करणे ही बाब महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका खंड 4पान क्र 147 पॅरा क्र 4 वारसा नोंद पद्धती क्रियारीती नुसार आवश्यक आहे
काही 7/12 पाहिल्यास society चे 7/12 अभिलेखात सदर सोसायटी चे चेअरमन व सेक्रेटरी यांची नावे नमूद केलेली आढळतात
यामुळे असंख्य न्यायालयीन समस्या कालांतराने निर्माण होतात
मूळ share सर्टिफिकेट धारक यांचे मृत्यूनंतर वारसा मध्ये वाद निर्माण झालेवर त्या वेळी जर 7/12 सदरी सदर मृत धारक याचे नाव नमूद असलेस तो महत्वाचा महसुली पुरावा वारसा प्रश्नी न्यायालयात उपयोगी पडतो
विविध महसुली litigation पाहता वारसा प्रश्न ही सर्वात मोठी समस्या सध्या निर्माण झाली आहे
आणि एकदा मूळ वारस या जगातून निघून गेला की प्रॉपर्टी बाबतच्या समस्या अत्यंत जटिल बनून जातात
Comments
Post a Comment