क्लस्टरची क्लेव्हर अंमलबजावणी
क्लस्टरची क्लेव्हर अंमलबजावणी ठाणे शहरामध्ये मार्च, २०१४पर्यंत असलेली क्लस्टर पात्रतेची मर्यादाही आता डिसेंबर, २०२० पर्यंत झाल्याने क्लस्टर पात्रतेचा परिघ वाढला आहे. किसन नगर येथील नागरी पुनरुत्थान आराखडा २३ मधील यूआरसी एक व दोनमधील २६ हजार ८५१ बांधकामांमध्ये राहणार्या लाभार्थ्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये १४ मार्च २०१४च्या नियमाप्रमाणे नियोजन असले तरी त्यानंतर डिसेंबर २०२०पर्यंत झालेल्या बांधकामांना यामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या क्लस्टर सेलकडून आवाहन करण्यात आले आणि आवश्यक कागदपत्रे क्लस्टर सेलकडे सादर करून क्लस्टरमध्ये पात्र होण्याची संधी देण्यात आली. आता प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या काही दिवसांत किसन नगर येथील पुनर्विकासाचा नारळ वाढविला जाण्याची चिन्हे आहेत. ठाण्यातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर योजनेच्या कामास अखेर सुरुवात झाली आणि गेली अनेक वर्षे रखडलेल्या या प्रश्नाला गती मिळाली. ही योजना होणे अत्यंत गरजेचे होते. कारण अनेक धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. त्याम...