मानीव अभिहस्तांतरण { Deemed Conveyance }
मानीव अभिहस्तांतरण { Deemed Conveyance } : स्वागतार्ह सुधारणा संस्थेची इमारत तर उभी राहिली, परंतु ती ज्या जमिनीवर बांधण्यात आली तिची मालकी अन्य कोणाकडेच असते. मानीव अभिहस्तांतरण आदेश व प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सुधारित आदेशाबाबत विशेष माहिती देणारा प्रस्तुत लेख.. मानीव अभिहस्तांतरण म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनीची मालकी व हक्क हस्तांतरित करणे. सरकारने मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम १९६३ मध्ये दुरुस्ती करून संस्थांना मानीव अभिहस्तांतरण करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत जमीन मालक व विकासक जमीन व इमारत यांच्या विहित मुदतीत संस्थेस हस्तांतरण करून देण्यास टाळाटाळ करतात अशा संस्थेस मालमत्तेच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी जिल्हा उपनिबंधकाकडे अर्ज करता येतो. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या चौकशीनंतर उपनिबंधक मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देऊन मालमत्तेचे हस्तांतरण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे करून देतात. संस्थेची इमारत तर उभी राहिली, परंतु ती ज्या जमिनीवर बांधण्यात आ...