ठाण्यातील 500 चौ. फु. पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत
- Get link
- X
- Other Apps
सतर्क नागरिक फौंडेशन®
प्रति,
मा. महापौर साहेब,
ठाणे महानगर पालिका,
ठाणे
विषय: ठाण्यातील 500 चौ. फु. पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत
महोदय,
२०१७ च्या महानगर पालिका निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात आपल्या पक्षाने ठाण्यातील जनतेला वचन दिले होते की सत्तेवर आल्यानंतर आपला पक्ष 500 चौ. फु. पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करेल.
अशाच प्रकारचे वचन मुंबईत सुध्दा आपल्या पक्षाने दिले होते.
जनतेने विश्वास ठेवून दोन्ही ठिकाणी आपल्याला विजयी केले.
वचनपूर्ती म्हणून मुंबई महानगर पालिकेने गेल्या वर्षी तसा प्रस्ताव मंजूर करून परिपत्रक काढले आहे.
( सोबत जोडत आहे)
तरी आपणास विनंती आहे की आपण असेच परिपत्र ठाण्यात काढून वचनपूर्ती करावी व जनतेला दिलासा द्यावा!
आपला,
सतर्क नागरिक फौंडेशन® साठी,
दयानंद नेने
- Get link
- X
- Other Apps
चांगली मांडणी केली आहे. अनेक वर्षे अधिकृत इमारतीत रहाणारे ३५-४० वर्षानंतर रस्त्यावर येतील कि काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल
ReplyDelete