अभिहस्तांतरासाठी ( कन्व्हेयन्स किंवा डीम्ड कन्व्हेयन्स ) साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
*अभिहस्तांतरासाठी ( कन्व्हेयन्स किंवा डीम्ड कन्व्हेयन्स ) साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे*
*सोसायटी* : नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची यादी, खरेदी करारनामा
*सदस्य* : मुद्रांक आणि नोंदणी शुल्क भरल्याची पावती, पुनर्खरेदीदारांनी मुद्रांक व नोंदणी शुल्क भरल्याची पावती, सर्व करारनाम्यांची ‘इंडेक्स टू’ प्रत
*विकासक किंवा जमीन मालक* : विकास करारनामा, मृत जमीन मालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, भागीदार असल्यास त्यांच्यातील ‘पार्टर्नरशिप डीड’, पार्टर्नरशिप डीड नोंदणीकृत झाल्याचा पुरावा, बिल्डरसोबत कन्व्हेयन्स करारनामा, विकास करारनाम्यावर वारश्यांच्या सह्य़ा असल्यास विल, प्रोबेटची प्रत, जमीन करारनामा
*सिटी सव्र्हे / तलाठी/ तहसिलदार कार्यालय* : ७/१२ चा उतारा, व्हिलेज फॉर्म क्र. ६, प्रॉपर्टी कार्ड, सिटी सव्र्हे नकाशा
*जिल्हाधिकारी कार्यालय* : जमीन अकृषि असल्याचा आदेश, नागरी जमीन धारणा कायद्यानुसार आदेश, अकृषि कर भरल्याची पावती
*महापालिका* : इमारतीचा मंजूर आराखडा, आयओडी, सीसी, ओसी, इमारत बांधून पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता कर भरल्याची पावती, स्थळ नकाशा
*खासगी तज्ज्ञांकडून अहवाल* : सव्र्हे रिपोर्ट, सर्च रिपोर्ट, टायटल रिपोर्ट (वकिलामार्फत)
Comments
Post a Comment