चुकीचे काम करणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर शासन कारवाई करेल: सहकार मंत्री सुभाष देशमुख
चुकीचे काम करणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर शासन कारवाई करेल: सहकार मंत्री सुभाष देशमुख
चुकीचे काम करणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर शासन कारवाई करेल: सुभाष देशमुख
पुणे : राज्यातील गृहनिर्माण संस्थेतील सभासद आपले देखभाल शुल्क न भरता संस्थेच्या नांवे तक्रारी करून संस्थेला वेठीशी धरतात. अशा तक्रार करणाऱ्या सभासदा बाबत नियम बनवावे असा निर्देश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सहकार विभागाला दिला .
सहकार विभाग, सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या वतीने रविवारी आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आमदार कुलकर्णी, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विभागीय सहनिबंधक मोहंमद आरिफ, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आदी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित या कार्यशाळेला शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, सभासदांची मोठी गर्दी झाली होती.
कार्यक्रमामध्ये अनेकांनी सोसायट्यांशी संबंधित अनेक समस्या मांडल्या. त्यावर बोलताना देशमुख यांनी चुकीचे काम करणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर शासन कारवाई करेल, असे स्पष्ट केले.
तसेच सोसायट्यांच्या विविध अडचणींसंदर्भात कायमस्वरूपी कक्ष सुरू केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सहकार विभागात ३० ते ४० टक्के मनुष्यबळाचा अभाव तसेच कर्जमाफीच्या कामामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष देता येत नसल्याची कबुली सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी यावेळी दिली.
Comments
Post a Comment