वेबसाईट बंद - काम थप्प - लोकांचे हाल
सहकारसूत्र
फेब्रुवारी 21, 2019
प्रति,
मा. सहकार आयुक्त,
मध्यवर्ती इमारत,
सहकार भवन, पुणे.
महोदय,
विषय : वेबसाईट बंद - काम थप्प - लोकांचे हाल
मागील ४ महिन्या पासून https://mahasahakar. maharashtra.gov.in हे संकेतस्थळ ( वेबसाईट ) बंद आहे.
परिणामी, या संकेतस्थळावरून मानीव अभिहस्तांतरण व इतर e - सेवा online करता येत नाहीत.
मानीव अभिहस्तांतरण अर्ज हे केवळ ऑनलाईन स्वीकारले जातात. उपनिबंधक कार्यालये off लाइन अर्ज स्वीकारत नाहीत.
आधी ऑनलाईन अर्ज भरा आणि त्याची प्रत आणून द्या असे सांगून ते लोकांना परत पाठवतात.
अशी उत्तरे म्हणजे सरकारी कार्यालयाने जनते शी पुकारलेला एक प्रकारचा असहकार आहे.
यात पंचाईत आमच्या सारख्या NGO ची होते.
आम्ही मानीव अभिहस्तांतरण सारख्या योजना लोकांपर्यंत पोहचवतो. सोसाट्यांच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करतो, त्यांना प्रवृत्त करतो.
आधीच जनता अशा कामांबद्दल उदासीन असते. त्यात संकेतस्थळ बंद पडले म्हणून अर्ज स्वीकारायचे नाहीत असे घडले तर दुष्काळात तेरावा महिना असेच म्हणावे लागेल.
तरी आपण ह्या विषयात त्वरित लक्ष घालून जो पर्यंत संकेतस्थळ दुरुस्त होत नाही तो पर्यंत मानीव हस्तांतरण अर्ज physical form मध्ये स्वीकारावे आणि त्यावर प्रक्रिया सुरु करावी ही नम्र विनंती.
त्याचप्रमाणे संकेतस्थळ वारंवार का बंद पडते याची शहनिशा करावी ही विनंती.
आपला सहकार्येच्यूक,
सहकारसूत्र साठी,
दयानंद नेने
अध्यक्ष
Comments
Post a Comment