आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?


आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?
मग आता पहा .............
स्थिर आकार - मार्च - २०१७ मध्ये रु. - ५५.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१७ मध्ये रु. - ५९.००
स्थिर आकार - मे - २०१७ मध्ये रु. - ६०.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१८ मध्ये रु. - ६२.००
स्थिर आकार - मे - २०१८ मध्ये रु. - ६५.००
आणि आता ऑक्टोबर - २०१८ मध्ये १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
प्रत्येक महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर - २०१८ पासून १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
या आधी एका नवीन आकाराची भर टाकली होती त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U. त्या आकारामुळे मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून वीज वितरण कंपनी अक्षरशः आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष्य करत आहोत. या विरोधात कोणी आवाज उठवेल का?
वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे.
कृपया हा मेसेज पुढे पाठवा सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे.
आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात वीज दर आहेत
० - १०० - रु ३.००
१०१ - ३०० - रु ६.७३
३०१ - ५०० - रु ९.७५
तेच दिल्लीमधे
० - २०० - रु २.००
२०० च्या वर - रु २.९७५ / ३. वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ .
म्हणजेच
महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/-
आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/-
🔍 जागो ग्राहक जागो 🔍🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

Information regarding Share Certificate of Housing Societies

100 POINT SECURITY GUIDELINES TO CITIZENS IN HOUSING SOCIETIES

MEETINGS & MINUTES WRITING OF CO-OPERATIVE HOUSING SOCIETIES