गृहनिर्माण संस्थेस ट्रान्सफर फी रू. 25,000 पेक्षा अधिक पैसे देऊ नका.
"प्रिमियमची रक्कम जास्तीसजास्त रु. २५०००/- असेल", तसेच २५०००/- किंवा संस्थेच्या सर्वसाधारण सभेने ठरावकरून संमत केलेल्या रक्कमेपेक्षा जी रक्कम कमी असेल ती राहील. सदनिका / गाळा हस्तांतर करतांना आकारावयाच्या प्रिमियम दराबाबत असे स्पष्ट परिपत्रक सहकार विभागा तर्फे काढण्यात आले आहे .
सहकारी संस्थेच्या आदर्श उपविधीतील उपविधी क्र. ३८(नऊ ) मध्ये शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रका नुसार मर्यादेमध्येच हस्तांतरण शुल्क आकारले पाहिजे अशी तरतूद आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९(अ ) अव्यये शासना तर्फे हौसिंग मॅन्युअल २०११ लागू केले आहे. त्या मध्ये प्रकरण ३ मधील मुद्या ३. १० अन्वये स्पष्टपणे नमूद केले आहे .
तरी सुध्दा काही गृहनिर्माण संस्था शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जादा प्रिमियम शुल्क आकारणी करण्याचा ठराव पारित करतात.
अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने ९ ऑगस्ट २०१८ रोजी एक परिपत्रक काढून असे स्पष्ट निर्देश दिले आहेकी, सहकारी गृहनिर्माण संस्था या आदेशाचे पालन करत नसेल तर त्या संस्थेच्या पदाधिकारी आणि समिती विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ ( ३ ) अव्यये संबधित निबंधकाने कारवाई करावी.
Comments
Post a Comment