नवीन घर घेणाऱ्यांनो सावधान !!!

नवीन घर घेणाऱ्यांनो सावधान !!!

सर्व ग्राहकांसाठी महत्त्वाचा सल्ला:

२०१९ च्या इलेक्शनच्या तयारीसाठी अनेक राजकीय नेत्यांनी  बिल्डर-डेव्हलपरकडे ठेवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक बिल्डर-डेव्हलपर्सच्या पायाखालची माती सरकली आहे. कारण त्यांनी विकसित केलेल्या अनेक गृहसंकुलांमध्ये गिऱ्हाईकच नाहीत. कोटींच्या घरातले फ्लॅट इथेकुणाला परवडणार आहेत?

पण राजकारण्यांना इलेक्शनसाठी त्यांचं काळं धन परत करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे बिल्डर-डेव्हलपरला जागांचे भाव खाली आणण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे रिअल इस्टेट म्हणजे राहत्या जागांचे भाव झपाट्याने 
खाली येणार यात शंकाच नाही. 

शहरांमधे पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असताना, रस्ते नसताना, ड्रेनेज नसताना तिथल्या मोठ्या प्रोजेक्टसाठी बिल्डर  आघाडीच्या हिंदी/मराठी सिनेमा नट/नटींचा चेहरा वापरून तसेच खेळाडूंचे चेहरे वापरून लोकांनी फ्लॅट घ्यावेत म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मेट्रोरेल्वे, रिंग रोड जवळ इ. जाहिरातीद्वारे प्रचंड मारा करून व GST  रजीस्टरेशन खर्च कमी सोबत कार, दागिने, किचन अक्सेसरीज वगैरे निःशुल्क देण्याचं आमीषही दाखवतायत. वर्तमान पत्रवाले पण लेख लीहुन व एक्झिबीशन/मेळावे घेवून ग्राहकांना भुलवत आहेत. पण ग्राहकांनो सावधान!

हीच वेळ आहे एकजूट दाखवण्याची. या जाहिरातींना भुलून जाऊ नका. कारण बड्या बिल्डर-डेव्हलपर लॉबीची नुकतीच एक गोपनीय मीटिंग झाल्याचं समजलय. 

त्यात त्यांनी जागांचे भाव ५० टक्क्यांपर्यंत उतरू द्यायचे नाहीत, अशी स्ट्रॅटेजी आखल्याचं समजतं. केवळ २५ टक्क्यांपर्यंत भाव उतरवले तरी मिडलक्लास जागांवर उड्या मारेल आणि  रिअल इस्टेट तेजीत येईल अशी त्यांची योजना आहे. पण मध्यमवर्गीय ग्राहकांनो सावधान तुम्ही एकजूट ठेवा. जागांचे भाव आता आहेत 
त्याच्या निम्मे येईपर्यंत घाई करू नका. हा गेम ऑफ पेशन्स आहे. प्रचंड होल्डिंग कपॅसिटी असलेले बिल्डर जिंकतात की घरांची गरज असलेला सर्वसामान्य जिंकतो, हे आता लोक बघतायत. यात काही बँकाही भरडल्या जाण्याचा संभव आहे. बिल्डरांना कोट्यवधी रुपयांचं कर्ज देणारी एक बँक सध्या डगमगते आहे. अनेक बँकांना गिऱ्हाईके नाहीत. कारण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, असेच लोक सध्या जागा विकत घेताहेत. इथल्यापेक्षा दुबईतले घर स्वस्त झाले आहे. पण मराठी मध्यमवर्गीयांनो जागांचे भाव कृत्रिमरीत्या वाढवणाऱ्या बिल्डरांना नमवण्याची हीच संधी आहे. तुम्ही जर एकजूट दाखवून पेशन्स दाखवला आणि जागांचे भाव ५० टक्के खाली आल्याशिवाय नवे घर घेणार नाही अशी धमक दाखवली तर सर्वसामान्य लोकांना ग्राण्टेड धरणाऱ्या बिल्डरांना कायमचा धडा शिकवता येईल. 

Comments

Popular posts from this blog

Information regarding Share Certificate of Housing Societies

Builder bound to form Society if 51% flats are booked as per MahaRERA

100 POINT SECURITY GUIDELINES TO CITIZENS IN HOUSING SOCIETIES