घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाची लॉटरी, जाहिरात प्रसिद्ध
घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाची लॉटरी, जाहिरात प्रसिद्ध
: मुंबई आणि मुंबईलगतच्या परिसरात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने सुखद बातमी दिली आहे. म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाने 4 हजार 275 घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ठाणे, मीरा रोड, विरार, सिंधुदुर्ग या शहरांमध्ये घर घेऊ पाहणाऱ्यांचे स्वप्न साकार होणार आहे. 13 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणीही सुरु होणार आहे. सर्व घरांसाठी अर्जांचं शुल्क 300 रुपये असणार आहे.
कुठे किती घरं?
विरार – 3,755 घरं
बाळकुम (ठाणे) – 19 घरं
कावेसर (ठाणे) – 164 घरं
मीरा रोड – 310 घरं
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – 27 घरं
कोणत्या गटासाठी किती घरं?
अत्यल्प उत्पन्न गट – 329 घरं
अल्प उत्पन्न गट – 2,630 घरं
मध्यम उत्पन्न गट – 1,311
उच्च उत्पन्न गट – 6
डिपॉझिट किती?
अत्यल्प उत्पन्न गट – 5 हजार 300 रुपये
अल्प उत्पन्न गट – 10 हजार 300 रुपये
मध्यम उत्पन्न गट – 15 हजार 300 रुपये
उच्च उत्पन्न गट – 15 हजार 300 रुपये
कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा :
अत्यल्प उत्पन्न गट – 16 हजार रुपयांपर्यंत
अल्प उत्पन्न गट – 16,001 ते 40,000 रुपये
मध्यम उत्पन्न गट – 40,001 ते 70,000 रुपये
उच्च उत्पन्न गट – 70,001 पेक्षा जास्त
घरांच्या किंमती:
अत्यल्प उत्पन्न गट – 4 ते 12 लाख रुपयांदरम्यान घर
अल्प उत्पन्न गट – 18 ते 24 लाख रुपयांदरम्यान घर
मध्यम उत्पन्न गट –18 लाख रुपये (वेंगुर्ला), 41 लाख रुपये (विरार)
उच्च उत्पन्न गट – सुमारे 41 लाख रुपये
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन नोंदणी – 13 जानेवारीपासून
ऑनलाईन नोंदणी अंतिम तारीख – 7 फेब्रुवारी
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 15 जानेवारीपासून
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 9 फेब्रुवारी
ऑनलाईन पैसे भरण्याची मुदत – 9 फेब्रुवारी
डीडी किंवा पे ऑर्डरने पैसे भरण्याची अंतिम तारीख – 11 फेब्रुवारी
घरांसाठी आलेल्या अर्जांची तात्पुरती यादी प्रसिद्धीची तारीख – 16 फेब्रुवारी
घरांसाठी आलेल्या अर्जांची अंतिम यादी प्रसिद्धीची तारीख – 19 फेब्रुवारी
लॉटरीची तारीख – 24 फेब्रुवारी
संपर्क:
म्हाडाचं संकेतस्थळ: https://lottery.mhada.gov.in
हेल्पलाईन नंबर : 9869988000 / 022-26592692/93
ईमेल : kblottery@mhada.gov.in
Comments
Post a Comment