*सोसायट्या ना पुरवणी मालमत्ता-पत्रक*
*Property Card for members of CHS*
(अतिशय महत्वाचे)
महाराष्ट्र शासनाने मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance) ही योजना सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी लागू केली.
मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत वेळोवेळी सुधारणा केली. आता तर कागदपत्रांची संख्याही कमी केली आहे.
असे असूनही बऱ्याच सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कन्व्हेअन्सचा प्रश्न सुटत नाही आहे.
*ह्याची जी काही कारणे असतील त्यापैकी एक कारण - काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालकी-हक्क मिळणे हे सर्वस्वी संबंधीत संस्थेच्या मॅनेजिंग समितीच्या मर्जीवर - म्हणजेच समितीतील काही मुठभर सभासदांच्या मर्जीवर अवलंबून राहू लागले आहे - हे आहे का?*
जर असे असेल तर हे कितपत योग्य आहे?
संस्थेचे कामकाज व्यक्तीगत मर्जीवर अवलंबून राहू नये.
*सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कामकाज कायद्याच्या चौकटीतच होणे आवश्यक आहे व वैयक्तिक हितसंबंधांना थारा दिला जाऊ नये. विषय कोणताही असला तरी संस्थेच्या कामकाजात संस्थेच्या हिताला प्राथमिकता दिली गेली पाहिजे व कन्व्हेअन्स सारखे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जाणे अतिशय आवश्यक आहे.*
*सरकारतर्फे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना पुरवणी मालमत्ता-पत्रक दिले जाणार आहे.*
*ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कन्व्हेअन्स झालेले नाही अशा संस्थेतील सभासदांना पुरवणी मालमत्ता-पत्रक मिळणार नाही म्हणजेच कन्व्हेअन्स अभावी सोसायटीच्या नावे मालमत्ता-पत्रक मिळणार नाही व सोसायटीच्या नावे मालमत्ता-पत्रक नाही म्हणून सभासदांना पुरवणी मालमत्ता-पत्रक मिळणार नाही.*
कन्व्हेअन्सबाबत समविचारी सभासदांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
*दयानंद नेने*
*सहकारसुत्र*
Comments
Post a Comment