कोरोना संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र मागण्याचा अधिकार कोणाला आहे?

जर संबंधीत व्यक्तीने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यास नकार दिला तर त्या व्यक्तीवर काय कारवाई होऊ शकते व तशी कारवाई कोण करणार?

वैद्यकीय प्रमाणपत्र मागण्याचा अधिकार कायद्याने कोणाला दिलेला आहे? 

घरकाम करणाऱ्या व्यक्तीने जर घरमालकाकडे वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले तर तसे प्रमाणपत्र घरमालक देणार का?

जर सोसायटीतील सभासदाकडे पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले व जर संबंधीत सभासदाने पदाधिकाऱ्यांना त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले तर पदाधिकारी तसे प्रमाणपत्र देणार का? 

जर कार्यकारी मंडळाला वैद्यकीय प्रमाणपत्र मागण्याचा अधिकार असेल तर असे प्रमाणपत्र ज्या व्यक्ती कडे मागितले जाते त्या व्यक्तीला सुध्दा प्रमाणपत्र मागण्याचा अधिकार असला पाहिजे.

बऱ्याच सोसायटीमधून कायदा फक्त सर्वसामान्य सभासदांसाठी असतो. जर कार्यकारी मंडळापैकी कुणी परगावाहून आला व ही बाब त्याने गुप्त ठेवली तर?

Comments