जा.क्र. खा-12345/सेवालय/2019 सप्टेंबर १६, २०१९
विषय: नवी मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत सी. बी.डी बेलापुर, कोकण भवन येथे असलेले
मुंबई सहकारी संस्थाचे प्रशासकीय, सहाय्यक आणि उपनिबंधक सहकारी संस्था यांची
कार्यालये, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत स्थलांतरीत करण्याबाबत.
महोदय,
घाटकोपर, विक्रोळी, विद्या विहार , कुर्ला, चेंबुर, आणि मानखुर्द येथे कार्यरत असलेल्या सर्व सहकारी संस्थाचे आणि वॉर्ड एल,एम,एन. आणि एस. यांच्या हद्दीत येणा-या सहकारी संस्थाचे प्रशासकीय उपनिबंधक व सहकारी निबंधक यांचे कार्यालय, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत असण्याऐवजी ते बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीबाहेर कोकण भवन,सी.बी.डी. बेलापूर येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सन 1981 पासून कार्यरत आहे.
सदर कारणास्तव घाटकोपर,विक्रोळी,विद्या विहार,कुर्ला, चेंबुर, आणि मानखुर्द येथे राहणा-या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाच्या सभासदांना इतर वॉर्डाच्या तुलनेत दुजाभाव झालेला आहे. त्यामुळे लाखो सभासदांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असणारे वॉर्ड क्र.ए.बी.सी.डी.ई.एफ. – नॉर्थ, जी- नॉर्थ, एफ – साऊथ, के (पूर्व) पी, आर आणि टी यांच्या अखत्यारीत येणा-या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था व त्यांचे निबंधक आणि उपनिबंधक यांचे कार्यालय मुंबई येथेच स्थित आहेत.
मात्र वॉर्ड क्र एल ,एम ,एन ,व एस या वॉर्डातील लोकांना निबंधकांकडे काहीही काम असल्यास बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीच्या बाहेर म्हणजेच, कोकण भवन, सी बी डी बेलापूर येथे जावे लागते.
आपणास विनंती आहे की लोकांना होणारा त्रास कमी करून त्यांना राहत देण्यासाठी कृपया वॉर्ड क्र. एल, एम, एन ,व एस यांच्यासाठी असलेली सहकारी संस्था व त्यांचे निबंधक आणि उपनिबंधक यांचे कार्यालये मुंबई च्या हद्दीत आणावी आणि लाखो लोकांना दिलासा द्यावा.
मनोज कोटक
मा. ना. श्री सुभाषराव देशमुख ,
मंत्री , सहकार
महाराष्ट्र शासन, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२
Comments
Post a Comment